7.2 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांचा शपथविधी आधी शरद पवारांना फोन

Published:

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज होत आहे. या आधी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण

माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथ विधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शपथ विधी सोहळ्याला उपस्थित रहावं, यासाठी त्यांना निमंत्रित केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना विनंती केली आहे.

महायुतीत मंत्रि‍पदावरून घोडं अडलं? आज फक्त तिघांचाच शपथविधी, कारण…

Devendra Fadnavis फडणवीस सरकारचा आज शपथविधी

आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार अशी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. 11 डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात इतर मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img