विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर अखेर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतलीयं. तर अजित पवार यांनीही शपथ घेतलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राज्यपाल सी.के. राधाकृष्णन आणि लाडक्या बहिणींच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलीयं.
या महाशपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसह विविध क्षेत्रातील बड्या मान्यवरांनी हजेरी लावलीयं. विशेष म्हणजे या महाशपथविधी सोहळ्याचं निमंत्रण विरोधी नेत्यांसह राज्यातील लाडक्या बहिणींनाही देण्यात आलं होतं. त्यानूसार लाडक्या बहिणींनीही या महाशपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
मागील अनेक दिवसांपासून या महाशपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरु होती. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावं, अशी विनवणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विनवणीला मान देऊन उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा पार पडलायं.
‘देवेंद्र’पर्व सुरू! फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. देशातील उद्योजक मुकेश अंबानी, अभिनेते सलमान खान, संजय दत्त, कलाकारांसह धर्मगुरुंनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत या दिमाखदार सोहळ्याची शान वाढवली. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. देशातील उद्योजक मुकेश अंबानी, अभिनेते सलमान खान, संजय दत्त, कलाकारांसह धर्मगुरुंनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत या दिमाखदार सोहळ्याची शान वाढवली.