महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (BJP) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) झाले आहेत.
गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते आणि अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी आजच्या या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावलेली आहे. पंतप्रधान मोदी, (Mahayuti Government) अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्याशिवाय भाजप आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 2 हजार व्हीआयपींना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं होतं. शपथविधीपू्र्वी देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी शपथविधीला जाण्यापूर्वी त्यांना घरी टिळक लावून आशीर्वाद दिला.
देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या काळात पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये ते अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, पण दोन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या वेळी ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आजच्या शपथविधीनंतर महायुतीची बैठक होणार आहे. पुढील रणनीती आणि मंत्रिमंडळ स्थापनेवर चर्चा केली जाईल. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान राज्याचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय.
तब्बल 10 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे…आता शिंदे, शिवसेना पुन्हा पेचात
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादीने 41 आमदार जिंकले. तर महाविकास आघाडीला (MVA) 46 आणि इतरांना 12 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने (UBT) 20 जागा जिंकल्या, काँग्रेसने 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या.
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आहे. यावरून केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.