-0.9 C
New York

Ajit Pawar : अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड; सलग सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) भाजपने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवली. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत पेच निर्माण झाला होता.महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवस प्रचंड गदारोळ झाला, मात्र महायुतीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर भाजपने शेवटची खेळी करत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ आज घेणार आहेत. आता उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) कोण होणार, किती उपमुख्यमंत्री होणार, कोणत्या पक्षाचे किती मंत्री होणार? हे सर्व प्रश्न आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या दणदणीत विजयात, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्याने 132 जागा मिळवल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.

देवेंद्र फडणवीसांनी सांगितला शपथविधीनंतरचा रोडमॅप

दरम्यान अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम आज नोंदवला जाणार आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. काँग्रेस आणि आघाडीची सत्ता असताना अजित पवार यांना दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून तर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर जुलै 2023 मध्ये शिंदे सरकारमध्ये देखील अजित पवार उपमुख्यमंत्री होते. यासोबतच पवारांना ऊर्जा मंत्री, जलसंपदा मंत्री म्हणून देखील काम केलंय. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरणार आहेत.

अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाची कारकीर्द जाणून घेऊ या. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012, ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014, पहाटेचा शपथविधी 2019, 23 ते 26 नोव्हेंबर 2019, डिसेंबर 2019 ते जून 2022, जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024, डिसेंबर 2024 असा आहे. आज शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. तर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवारांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img