12.5 C
New York

Earthquake : भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के

Published:

तेलंगाणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात आज पहाटे भूकंप (Earthquake)  झाला. 5.3 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली. हा भूकंप मुलुगू जिल्ह्यात झाला असला तरी त्याचे धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण तयार झालं आहे. सुदैवाने या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे नुकसानही झालेले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी या जिल्ह्यांत घराच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील फ्रीज, भांडी आणि खिडक्यांच्या काचांना हादरे बसले. त्यामुळे भयभीत झालेल्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. प्रशासनाने नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन केले आहे.

आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी

Earthquake  नागिरकांमध्ये घबराटीचे वातावरण

महाराष्ट्रातील अनेक भागांत जाणवलेल्या या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा तेलंगणमध्ये होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यात सकाळी रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे झटके हैदराबादमध्येही बसले. सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खोल होते. यामुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी संबधित अधिकारी हे या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. तर स्थानिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क रहावे तसेच गर्दीच्या जागांपासून किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img