ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता असल्याने आणि (Weather Update) ढगाळ हवामानामुळे हा पावसाळा तर नाही ना..अशी मिश्किल टिप्पणी केली जात आहे. महाराष्ट्रातील चारही विभागाचा अंदाज पाहता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विदर्भात आज आणि उद्या हवामान कोरडे राहील तसेच पाच ते सात डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे त्या भागात थंडीचा जोर कमी राहील. मात्र, 8 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहणार असून आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या ढगाळ व दमट राज्यातील हवामान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानातही वाढ झाली आहे. IMD ने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात सिंधूदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
कोकण गोव्यात रत्नागिरीत पाच तारखेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात उद्या तर कोल्हापूर, सातारा येथे पाच व सहा डिसेंबरला सोलापूर येथे पाच डिसेंबरला पाऊस होईल. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशीव येथे पाच डिसेंबरला मेघ गर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल आणि तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पण नंतर तापमानात दोन ते चार डिग्री सेंटीग्रेडने तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं ठरलं! शिंदेंना नगरविकास खाते फिक्स, अजित पवारांचं काय?
Weather Update शेतकऱ्यांची चिंता वाढली
फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये दाणादाण उडाली आहे. पुद्दुचेरीतही मोठे नुकसान होत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी अनेक रस्ते जलमय झाले. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचे संकट निर्माण होत काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली. अवकाळी पावसाचे हे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
Weather Update कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 35 – 45 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मच्छिमारांना अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.