3 C
New York

Sunil Pal : हुश्श..! सुनील पाल सुखरुप

Published:

कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आली होती. सुनिल पाल हे आपल्या शोसाठी मुंबईच्या बाहेर गेले होते, मात्र, ते परत घरी आले नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत दाखल केली होती. त्यांचा फोनही मागील अनेक तासांपासून बंद असल्याचं पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास होत असतानाच आता सुनील पाल सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

सुनील पाल यांच्या पत्नीने दैनिक भास्करला माहिती देताना सांगितलं की सुनील आता बरे आहेत. दिल्लीहून मुंबईला परतत आहेत. त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं आहे. यानंतर आज सुनील पाल यांची पत्नी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय घडलं याची माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहे.

या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. सर्वात आधी पोलिसांनी सुनील पाल यांचा फोन नंबर ट्रेस केला. यावरून त्यांचं लोकेशन माहिती झालं. ते कोणत्या तरी अडचणीत सापडले होते. आता यानंतर काय घडलं, सुनील पाल यांच्यावर कोणता प्रसंग आला होता याची माहिती त्यांची पत्नी पत्रकार परिषदेत देणार आहे.

आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी

दरम्यान, कॉमेडियन सुनिल पाल मंगळवारी अनेक तासांपासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात सुनील पाल यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला होता. आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या कॉमेडीयन शब्दांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडलीयं. त्यांनी अपना सपना मनी मनी, फिर हेरा फेरी, बॉम्बे टू गोवा, किक सारख्या चित्रपटांमध्येही सुनील पाल यांनी काम केलं आहे.

सुनील पाल शेवटचे तेरी भाभी है पगले या चित्रपटात दिसले होते. यानंतर मात्र त्यांना पुन्हा चित्रपटात संधी मिळालेली नाही. मागील काही वर्षांत सुनील पाल कॉमेडी या संकल्पनेवर स्पष्ट मत व्यक्त करत होते. सोशल मीडियावर व्यक्त होत होते. यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्याची बातमी आल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु, आता सुनील पाल सुखरूप असून लवकरच मुंबईत येत असल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img