जो काँग्रेस के साथ जायेगा उसका दुकान बंद हो जायेगा, असं बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटलं, पण पित्याचं मुलाने ऐकलं नाही, या शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीयं. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी शपथविधीसह राज्यातील विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर सडकून टीका केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, चिडिया चुग गयी खेत फिर पछताने से क्या फायदा, बाळासाहेब ठाकरे यांनी 2002 सालीच सांगितलं होतं की, जो काँग्रेस के साथ जायेगा उसका दुकान बंद हो जायेगा, पण पित्याचं ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर काय करायचं. 2019 साली विश्वासघात केला नसता तर आज सन्मान झाला असता. आज उद्धव ठाकरे मोदींच्या बाजूच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले असते. आता काय फायदा हो कितीही महागड रिझर्वेशन असेल तरीही काही नाही होणार, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलीयं.
तसेच उद्धव ठाकरे यांना शिष्टाचारानूसार निमंत्रण आहे, शपथविधी सोहळ्याला तुम्ही येणार आहात की नाही हे माध्यमांनी त्यांना विचारायला हवं. ते निमंत्रणानंतर अपमान करणार नाही याची शाश्वती माध्यमांनी घ्यावी. लोकशाहीचा अपमान करणाऱ्यांना माध्यमांनी सोडायचं नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांसाठी खुर्ची असणार आहे. शिष्टाचाराच्या बाहेर जाता येत नाही. प्रत्येक पदाचं महत्व असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितला शपथविधीनंतरचा रोडमॅप
देवेंद्र फडणवीस यांची एकमताने सर्वांनी विधीमंडळ नेतेपदी निवड केलीयं. एक सुस्वभावी नेता एकनाथ शिंदे आहेत, आम्ही एकनाथजींसोबतच आहोत. आम्ही त्यांच्याबाहेर जात नाहीत. एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मोदींच्या निर्णयाच्या सन्मान करेल, कारण नसताना चांगल्या नेत्यावर अन्याय करु नका, विरोधी पक्षाचे नेते माध्यमांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
Sudhir Mungantiwar देवेंद्र फडणवीस विधीमंडळ नेते..
आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. यानंतर आता राज्यपालांकडे महायुतीतर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडे कोणत्याही पक्षाने आघाडीने बहुमताचा दावा करण्यापूर्वीच फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेली आमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे.