3 C
New York

Otur : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Published:

ओतूर प्रतिनिधी दि.३ डिसेंबर ( रमेश तांबे )

जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सदरची घटना सोमवारी दि.२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोरी साळवाडी रोडवर मुक्ताई डेरी समोर घडली असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. सदर बिबट्याला बोलेरो गाडीने धडक दिली असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे,मात्र याबाबत ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी यांना कुठलीच माहिती नसल्याचे समजते.

परिस्थितीकी संवर्धन हा पर्यटन रोजगाराचा गाभा —–उपवनसंरक्षक सातपुते

याबाबत वनपाल संतोष साळुंखे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, बोरी साळवाडी रोडवर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, बिबट्या रक्तस्राव होऊन,रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सदर माहिती मिळताच वनपाल संतोष साळुंखे,वनरक्षक विशाल गुंड, रेस्क्यू टीमचे सदस्य ऋषी गायकवाड,फिरोज पठाण,शुभम भोर,बबन निकम या टीमच्या सदस्यांनी रेस्क्यु जाळीच्या मदतीने,बिबट्याला रेस्क्यू करून, माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेश ढोरे यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.खोडद श्रेणी १ चे पशुवैद्यकीय अधिकारी शरद लोंढे यांनी मृत बिबट्याचे शिवविच्छेदन केले. बिबट्याच्या डोक्याच्या उजव्या बाजुस गंभीर मार लागन, अंतर्गत रक्तश्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर लोंढे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img