भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली बैठक.
Devendra Fadnavis लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी होणार
महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
शपथविधी सोहळा पार पडण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धातास चर्चा झाली. या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित आहे. शिंदे फडणविसांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर आलंय. या बैठकीमध्ये खातेवाटप, शपथविधी आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर ही बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय बदलल्याचं समोर आलंय.
महायुतीत सरकार स्थापनेच्या घडामोडी घडत असताना गृहखात्यावरून रस्सीखेंच सुरू होती. परंतु आता यावर तोडगा निघाल्याचं समोर आलंय. गृहखात्याऐवजी नगरविकास खातं आणि अजून एखादं महत्वाचं खातं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. उद्या महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. यासाठी अनेक संत महंत, त्याचप्रमाणे इतर राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रित केलंय. महायुतीचे महत्त्वाचे नेते आज सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय.
Devendra Fadnavis भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
दोन दिवस दिल्लीत थांबूनही अजित पवारांची आणि शाह यांची भेट झालीच नाही
भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंग सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंग धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
मोहन महाराज
जैन मुनी लोकेश