राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा हळूहळू सुटताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदावर महायुतीत जो तणाव निर्माण झाला होता आता तोही निवळू लागला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र त्याआधीच मोठी बातमी हाती आली आहे. यानुसार एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्यात उपमु्ख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे आता निश्चित झालं आहे. तसेच आज सकाळी नवीन विधीमंडळ पक्षनेत निवडण्यासाठी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी खात्रशीर माहिती मिळाली आहे.
निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून गेला तरी मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटत नव्हता. या आठ दिवसांच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. परंतु, आता मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा निकाली निघाला आहे. खातेवाटपावर रस्सीखेंच अजूनही सुरूच आहे. यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. मात्र त्याआधी शपथविधी उरकून घेण्याचं नियोजन आहे. उद्या मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेतील असे चित्र सध्या स्पष्ट झालं आहे.
याआधी आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभेतील मुख्य प्रतोद निवडले जाणार आहेत. या बैठकीआधी दोन्ही निरीक्षक भाजप कोअर कमिटीशी चर्चा करणार आहेत. याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिन्ही नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के
Mahayuti फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट
दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतला होती. सहा दिवसांनंतर या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली होती. मंत्रिपदे आणि खातेवाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
Mahayuti एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून नाराज असलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वाचे खाते दिले जाणार असल्याचीही माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अजित पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसेत या शपथविधी सोहळ्यात 20 पेक्षा जास्त आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील असे नियोजन करण्यात आले आहे.