5.2 C
New York

Devendra Fadnavis : अनेक विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत; ‘मी पुन्हा येईल’ ची Inside Story

Published:

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु होणार आहे. 2019 मध्ये फडणवीसांनी राज्यातील जनतेला ‘मी पुन्हा येईल’ असा शब्द 2019 मध्ये दिला होता. त्यावेळी त्यांच्या या विधानाची अनेकांनी खिल्ली उडवली होती. मात्र, आता तेच फडणवीस मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा असे म्हणत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री होत नाही ही परंपराही फडणवीसांनी मोडीत काढली आहे. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईल’ मागे नेमकी कोण कोणती कारणं आहेत याचाच घेतलेला हा आढावा…

Devendra Fadnavis कोणते गुण फडणीसांना परत घेऊन आले

‘मी पुन्हा येईन’ त्यावेळी त्यांची 2019 साली त्यांनी नारा दिला, खिल्ली उडवली. पण प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि सगळ्यांना जिंकून फडणवीस परत येत आहेत. फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते आहेत. अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी मुद्देसूद मांडणी हे गुण अनेकांना प्रभावित करतात.

Devendra Fadnavis आक्रमक विरोधी पक्ष नेता

महाविकास आघाडी सरकार अंतर्गत बंडाळीमुळे पडेल असं फडणवीस सातत्याने म्हणायचे. देवेंद्र फडणीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम केलंत्याला तोड नव्हती. अनेक दौरे कोरोना काळात त्यांनी केले, अनेक ठिकाणी भेटी दिल्या. थेट जनतेमध्ये जायला प्राधान्य दिलं. देवेंद्र फडणवीसांनी त्याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी आपलं काम सोडलं नाही.

उद्या शपथविधी घेणार का? एकनाथ शिंदेंचं नाही पण अजित पवारांचं कन्फर्म ठरलंय…

Devendra Fadnavis ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता

आणखी एक गुण फडणवीस यांचा म्हणजे ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता. त्यांच्यावर फक्त विरोधकच टीका करतात असं नाही, तर सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र, अन्य नेत्यांसारखी फडणवीसांनी कधीही आरडाओरड, आदळआपट केली नाही. ज्या टीकेला उत्तर देणं गरजेच आहे, त्याच टीकेलाच फडणवीसांनी योग्यवेळी उत्तर दिलं.

Devendra Fadnavis विकासाचं व्हिजन

इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. सत्ता काळात पायाभूत सोयी-सुविधाचे अनेक प्रकल्प त्यांनी त्यांच्या साडेसात वर्षाच्या मार्गी लावले. त्यांच्या कार्यकाळातच महत्त्वाच म्हणजे सुरु केलेले प्रकल्प पूर्ण झाले. देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा चाहता उदहारणार्थ मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड. त्यामुळे वर्ग तयार झाला.

उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला. त्याचाच फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचं दिसून येतंय. भाजपने त्यांच्या इतिहासाताली सर्वाधिक जागा तर जिंकल्याच, पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले.

Devendra Fadnavis विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत

राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावे अनेक विक्रमही नोंदवले गेले आहेत. यात शरद पवारांनंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान त्यांच्या नावे असणार आहे. याशिवाय फडवीसांच्या नेतृत्त्वाखाली 2014, 2019 आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप 100 पेक्षा जास्त आमदार विजयी करू शकली आहे. यात सर्वात अधोरेखित करणारी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत नाही. परंतु, ही परंपरा फडणवीसांनी मोडित काढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img