3.6 C
New York

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी सांगितला शपथविधीनंतरचा रोडमॅप

Published:

भाजपच्या (BJP) विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ (Devendra Fadanvis) घेतील, हे देखील जाहीर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही आहात त्यामुळे मी इथे आहे. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील वाट संघर्षाची असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. आपलं महायुतीचं (Mahayuti) सरकार असून सर्वांना एका दिलाने सोबत घेऊन सर्वांच्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. आपण मोठं गोलं घेवून राजकारणात आलो आहोत, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

फडणवीसांच्या सूचक विधानानं मोठा गेम होण्याची शक्यता; रोख नेमका कुणाकडे?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री (Maharashtra CM) झाल्यानंतर कोणत्या कामांना प्राथमिकता असेल हे स्पष्ट केलंय. फडणवीस म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीचं हे वर्ष आहे. आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं याकडे प्राथमिकता असेलच. त्याचसोबत महाराष्ट्राला पुढे नेत्याकरता, सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपणा सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचं आहे. 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळात झाली, असा आरोप देखील यावेळी फडणवीसांनी केलाय. एक नवीन सुरूवात आपण करत आहोत.

सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात त्रास देण्याचा प्रयत्न झाला. परंतु या काळात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सगळे नेते, सगळे आमदार संघर्ष करत होते. त्या संघर्षातूनच पुन्हा आपला विजय मिळाला आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. लाडक्या बहिणी, भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, दलित, वंचित या सर्वांनी जो जनादेश दिला आहे. त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीचं हे वर्ष आहे. याच महत्वाच्या वर्षात महायुतीवर जनतेने जबाबदारी दिली आहे. मोठा जनादेश जनतेने दिलाय. यातून आनंद असून जबाबदारी वाढली आहे. तीन वेळा मुख्यमंत्रि‍पदावर बसवलं, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे देखील आभार मानले आहेत. आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासनं पूर्ण करणं प्राथमिकता असून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी कार्यरत राहायचं आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img