3 C
New York

Ajit Pawar : दोन दिवस दिल्लीत थांबूनही अजित पवारांची आणि शाह यांची भेट झालीच नाही

Published:

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. असं असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) तब्बल दोन दिवस राजधानी दिल्लीत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी अजित पवार दिल्ली गेले होते. अजित पवार आणि अमित शाह यांची भेट दोन दिवस दिल्लीत मुक्काम केल्यानंतरही होऊ शकलेली नाही. अजित पवारांना त्यामुळे अखेर परत मुंबईकडे फिरावं लागलं आहे. दोन दिवस तळ ठोकून दिल्लीत थांबूनही अजित पवारांना अमित शाह यांच्या सोबतच्या भेटीसाठीचा वेळ मिळालेला नाही.

Ajit Pawar अजित पवार मुंबईकडे रवाना

अजित पवार आणि अमित शहा यांची दोन दिवस थांबूनही भेट नाही. अजित पवार पुन्हा आज सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार यांचा सोमवारी रात्रीपासून दिल्लीत तळ होता. जादा मंत्रिपदांसाठी आणि इतर चर्चा करण्यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटणार होते. शपथविधी तोंडावर असतानाच शाह यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.

भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के

Ajit Pawar अजित पवार दिल्लीत का होते?

अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. अधिकची मंत्रिपदं आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी आणि अपेक्षित खाती आपल्याकडे घेण्यासाठी अजित पवारांना अमित शाह यांना भेटणार होते. त्यासाठी ते दोन दिवस दिल्लीत होते. पण अमित शाह यांची भेट झाली नाही. शिवाय आज दुपारी महायुतीचे तीन पक्ष सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक होणार आहे. त्यासाठी अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

Ajit Pawar आज सत्तास्थापनेचा दावा, उद्या शपथविधी


महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपची आज गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडत आहे. तर आज दुपारी महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. तर उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img