सध्या सगळीकडे गारठा सुटला आहे आणि भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ फेंगल चक्रीवादळ(Fengal Cyclone) थैमान घालत आहे. या वादळाचा फटका महाराष्ट्राला देखील चांगलाच बसणार आहे तर येत्या ६ डिसेंबर पासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख(Panjabrao dakh) यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून थंडीने देखील जोर धरला आहे. मात्र ऐन थंडीच्या दिवसात पावसाची शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मका, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतमालाचे संरक्षण करा असा देखील सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ३ डिसेंबर पासून कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर २४ तासात ‘फेंगल’ हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवला आहे.
Rain Alert : थंडी गायब, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता
‘फेंगल’ चक्रीवादळ म्हणजे काय ?
“फेंगल’ हा मूळ शब्द अरेबी भाषेतील आहे. याचा अर्थ “उदासीन”असा होतो. समुद्राच्या पृष्ठभागावरुन पाण्याचे बाष्पीभवन हवेत होते तेव्हा चक्रीवादळ तयार होते. फेंगल चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर थैमान गालत आहे. दक्षिण भागात पावसाने हजेरी लावल्याने याचा फटका अनेक भागांना झाला त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्राला देखील होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांच्यासह हवामान विभागाने वर्तवली आहे.