-0.9 C
New York

Sushma Andhare : ….की भाजपचा गळा दाबायला शिंदेंना वेळ लागणार नाही; सुषमा अंधारे

Published:

राज्यात नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार? याचे वेध संपूर्ण राज्याला लागले होते. त्यानंतर काल अखेर चित्र स्पष्ट झालंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालंय, परंतु अजून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचं स्पष्ट केलंय. पण मुख्ममंत्री कोण असेल हे भाजपने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा उपनेत्या सोशल मीडिया X अकाउंटवर एक पोस्ट केलीय. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, विनोद तावडे यांना बाजूला करून कष्टाने देवेंद्र फडणवीस (bjp) यांनी तयार केलेला राजमार्ग शिंदे उध्वस्त करू शकतील का? गेम हळूहळू इंटरेस्टिंग होत चाललाय. शिंदे 1-1 पत्ते ओपन करत दबाव वाढवत आहेत. गृहखातं पदरात पडलं की, ज्या भाजपने हलक्यात घेतलं. त्यांचा गळा दाबायला शिंदेंना फारसा वेळ लागणार नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. परंतु अंधारे यांनी ही पोस्ट X अकाउंटवरून हटवली आहे.

…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करणार; शिवसेना नेत्याचा दावा

दरम्यान आज महायुती मुख्यमंत्री कोण? याची घोषणा करणार आहे. तर पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. अशातच एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर 5 तारखेपर्यंत राज्य कोणाच्या भरवशावर चालणार? असा तिखट सवाल देखील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता. यावेळी लाडकी बहीोण योजनेवरून सुषमा अंधारे यांनी भाजपला सुनावलं होतं. लाडक्या बहि‍णींना सत्तेत वाटा मिळणार का? असं देखील त्या म्हणाल्या होत्या.

लाडक्या बहिणी केवळ पंधराशेमध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली होती. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षातील एकही महिला मुख्यमंत्रि‍पदासाठी योग्य नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला होता. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी भाजपची बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा आज दिल्लीत महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. मागील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे गृहखात्याची मागणी केलेली आहे, यावरून मात्र सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img