विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालानंतर पहिला धक्का शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, विधानसभेत वार फिरलं आणि महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर आता पवारांच्या (Ajit Pawar) पक्षातून एक एक मोहऱ्याने तुतारी खाली ठेवण्यास सुरूवात केली आहे. त्यात पहिला नंबर पवारांच्या माजी आमदाराने लावला आहे.
राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. राहुल जगताप हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राहुल जगताप हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहुल जगताप लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येतंय. अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत.
….की भाजपचा गळा दाबायला शिंदेंना वेळ लागणार नाही; सुषमा अंधारे
आता अजित पवार आणि राहुल जगताप यांच्या भेटीत नेमकं काय घडलंय? याकडे देखील अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गटाने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर आता जगताप अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. लवकरच जगताप हातात घड्याळ बांधतील असा अंदाज वर्तवला जातोय, ते सध्या अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ही माहिती एबीपी माझ्याच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
राहुल जगताप हे माजी आमदार आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात होते. यंदा त्यांनी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांकडे उमेदवारी मागितली होती. परंतु महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी केली. त्यानंतर शरद पवार पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. परंतु निवडणुकीत मात्र जगताप यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची 62 हजार 37 मतं मिळाली आहेत. जर ते महाविकास आघाडीकडून लढले असते तर कदाचित जगतापांचा विजय झाला असता, अशी चर्चा देखील मतदारसंघात दबक्या आवाजात सुरू आहे.