10.6 C
New York

Rohit Pawar : पंकजा मुंडे मुख्यमंत्री?, रोहित पवार नेमकं काय म्हणाले….

Published:

विधानसभेला महायुतीचा (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यामुळं राज्यात महायुतीचे सरकार स्थापन येणार हे स्पष्ट झालं. शपथविधीला तीन दिवस बाकी आहेत. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा अद्याप झालेली नाही. अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, असं विधान केलं. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदाविषयी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल. त्या लोकनेत्या आहेत. ओबीसी समाज त्यांना मानतो. त्यामुळं त्यांना देखील संधी मिळू शकेल, त्यांना तर चांगली गोष्ट आहे, असं रोहित पवार म्हणाले.

विजय रूपाणी अन् निर्मला सीतारामन निवडणार महाराष्ट्राचा नवा CM

शिंदे गटाने गृहमंत्रीपदाची मागणी केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना धोका लक्षात आलाय, त्यामुळेच ते गृहमंत्रीपद मागत आहे. अजित पवार यांच्या पक्षातून कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवलं पाहिजे. मात्र, भाजपच ते ठरवतांना दिसतेय. शिंदे आणि अजित पवार गटातील जे आमदार भाजपला फॉर आहेत त्या आमदारांना मंत्रिपद मिळेल, असं रोहित पवार म्हणाले.

यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला. आपल्या पक्षात कोणाला मंत्री करायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतो. मात्र, या ठिकाणी सगळं भाजपचे दिल्लीतले नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शत प्रतिशत भाजपच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, असं रोहित पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट 88.06 टक्के आहे. या निवडणुकीत भाजपला लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला. जिथे भाजपचे उमेदवार होते, तिथे 10 टक्के फायदा ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं दिसत. ईव्हीएम सेट करण्यात आली होती, ईव्हीएममध्ये सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते, असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img