14.6 C
New York

Eknath Shinde : …अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करणार; शिवसेना नेत्याचा दावा

Published:

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता गृहखात्यावरून महायुतीत तिढा वाढला आहे. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय व त्यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

”शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसंच, महायुतीबाबत प्रसारमाध्यमं सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही. शिवसेनेने गृहमंत्रीपदाचा हट्ट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत असंही ते म्हणाले आहेत. तसंच, एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारलं आहे. निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरणं आमच्या स्वभावात बसत नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे आणि हसत हसत मुख्यमंत्रीपद नाकारलं असंही ते म्हणाले.

पुढचे उपोषण आझाद मैदानावर, जरांगेंचा इशारा

भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू असं शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून होत असलेल्या चर्चेला व प्रश्नांना काहीच अर्थ उरत नाही. सूत्रांच्या हवाल्याने आम्ही गृहमंत्रीपद मागितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमं दाखवत आहेत. त्याचबरोबर ”मी परवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होतो. आमच्याबरोबर आमचे इतरही नेते, मंत्री, आमदार होते. तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले, ‘मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो. त्यावर आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहायचं नाही. तुम्ही सत्तेत राहूनच काम करावं.

Eknath Shinde महायुतीत आज खातेवाटपावर चर्चा

एकनाथ शिंदे हे रविवारी साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी ते सोमवारी आल्यानंतर महायुतीतील खातेवाटप व मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं असून नेता निवडीसाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img