3.8 C
New York

Baramati constituency : अजितदादांनी निवडणूक जिंकली, मात्र पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात

Published:

बारामतीची राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक (Baramati constituency) चर्चेची निवडणूक ठरली होती. बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली. काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. काकाविरुद्ध पुतण्याने त्यानंतर पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. पाच टक्के ईव्हीएमची त्यामुळे बारामतीमध्ये फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Baramati constituency ११ उमेदवारांचे पडताळणीसाठी अर्ज

पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. युगेंद्र पवार यासंदर्भात बोलताना म्हणाले, फक्त माझाच पराभव विधानसभा निवडणुकीत झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो.

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; शिंदे मुंबईत कधी परतणार?

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूध्द पवार अशी लढत लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झाली. संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष या बारामती मतदारसंघारडे लागून राहिलं होतं. अजित पवारांनी पुन्हा एकदा विक्रमी मतांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. अजित पवारांना 1,96,640 तर 80,458 इतकी मते युगेंद्र पवारांना मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.

Baramati constituency मतदार संघात आभार दौरे

युगेंद्र पवार यांचे मतदार संघात दौरे सुरु आहे. बारामतीमधील लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे गावागावांत जाऊन लोकांना भेटत आहोत. त्यांना विश्वास देत आहोत. त्यांचे आभार मानत आहोत. नेहमीसारखा हा आभार दौरा आहे. लोकसभेतही आम्ही हा दौरा केला होता. पवार साहेबांनी दिलेल्या शिकवण दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img