14.1 C
New York

Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं…

Published:

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दुसरी बैठक पार पडणार असून या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत होणाऱ्या चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. दरम्यान, साताऱ्यातील दरे गावात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्याच्या पत्रकार परिषदेतच मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली असून पंतप्रधान नरेंंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं मी आधीच सांगितलं आहे. माझ्या या भूमिकेत कुठलाही किंतू परंतू नाही. अमित शाहा यांच्यासोबत आमची एक बैठक पार पडली असून दुसरी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मी जे काम केलं त्यामुळे मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. मी सर्वसामान्य माणूस म्हणून जनतेचं काम केलं. कॉमन मॅनच्या अडचणी समजून घेऊन मी काम केलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृ्वाखाली निवडणूका झाल्या, मिळालेलं यश चांगलं आहे त्यामुळेच यामध्ये, कोणाचा संभ्रम नको म्हणून मी पत्रकार परिषदेत सांगितलं की मोदी शाहा मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील, माझा पाठिंबा आहे कुठेही किंतू परंतू नसल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.

एकनाथ शिंदे जेव्हा दाढीवरून हात फिरवतात,तेव्हा…शिवसेना नेत्याचा सूचक इशारा?

आम्हाला काही मिळण्यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे? हे पाहणं महत्वाचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सध्या राज्यात अनेक चर्चांना उधाण आलंय. माध्यमांमध्येच अनेक चर्चा सुरु आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्यासोबत आमची दुसरी बैठक पार पडणार असून या बैठकीतून अनेक प्रश्न सुटणार आहेत. बैठकीत आम्ही महाराष्ट्र हिताचाच निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde विरोधकांना विरोधी पक्षनेताही होता आलं नाही….

विरोधकांना सध्या काही काम नाही, त्यांना विरोधी पक्षनेताही होता आलं नाही. राज्यातील जनतेने एवढं प्रेम दिलंय की विरोधी पक्षनेताही त्यांना होता आलेलं नाही. आता विरोधक ईव्हिएम, ईव्हिएम करताहेत. राज्यातील इतर अनेक राज्यांत निवडणुका पार पडल्या. तेव्हा ईव्हिएम हॅक झालं का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केलायं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img