-0.9 C
New York

Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Published:

राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. यावरून मविआचे नेते सातत्याने ईव्हीएम घोटाळे झाल्याचे (Maharashtra CM) आरोप करत आहेत. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळे ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवले आहेत. मतं निट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मिळतात, ही महाराष्ट्रातील लोकशाही आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय.

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितलं की, 5 डिसेंबर रोजी शपथविधी होईल. यावर राऊत म्हणाले की, यावेळी महाराष्ट्रात एक असं सरकार जे सुप्रीम कोर्टाच्या संरक्षणाखाली चाललं, जे संविधानाच्या विरोधात अन् घटनाबाह्य सरकार होतं. याला डीवाय चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात बसून आदेश देतात की, 5 तारखेला शपथविधी होणार. सरकार स्थापन होणार. त्यांना काय राज्यपाल बनवलं गेलंय का? असा देखील सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

PM मोदींच्या उपस्थितीतीत गुरुवारी शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात

राज्यात आता जे काही काळजीवाहू सरकार (Maharashtra Politics) आहे, ते देखील संविधानाच्या विरोधात आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. एकट्या भाजपकडे बहुमत आहे, तरीदेखील या लोकांनी अजून सरकार स्थापन केलेलं नाही. तरी देखील अजून या लोकांनी राजभवनात जावून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवस उलटले असून या लोकांनी अजून सरकार स्थापनेचा दावा देखील केलेला नाही.

राज्यपालांचे अधिकार या लोकांनी हातात घेतले आहेत. राज्यपालांनी इथे राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. जनता सगळं बघत आहे. निवडणूक कशी झाली, ईव्हीएममध्ये कशी गडबड झाली? पैसांचा खेळ कसा चालला हे सगळं बघत आहे. काल पुण्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बाबा आढावांसोबत आंदोलन केलंय. त्यांचं वय 95 वर्ष आहे, आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलंय. या घोटाळ्याविरोधात येणाऱ्या काळात एक मोठी चळवळ उभी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

इतकं मोठं बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नाही, ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांना सस्पेन्स ठेवायची काय गरज आहे. दिल्लीतून केवळ एका नावाची घोषणा करायची आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. देशात आज अराजकतेची स्थिती आहे, याला जबाबदार सर्वोच्च न्यायालय असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img