6.5 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देताना सरकारचे नवीन नियम

Published:

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच्या सरकाराने झालेल्या पराभवानंतर उभारी घेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केली. दरमहा महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने घेतला. विशेष म्हणजे महायुतीसाठी ही योजना इतकी प्रभावी ठरली की, महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मात्र, आता महिलांना 2100 रुपयांची प्रतिक्षा आहे. कारण दरमहा महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आल्यास करण्यात आली होती. परंतू, आता हेच सरकार काही निकषांच्या आधारे 2100 रुपये देताना पडताळणी करणार असून त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.

महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही थेट जमा होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ही योजना महायुतीसाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरली. या योजनेमुळे महायुतीला लोकसभेला पाठ फिरवलेल्या जनतेले पुन्हा सत्तेच्या बाकावर बसवले. पण, अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. तसेच, महिलाही 2100 रुपये खात्यात कधी जमा होणार म्हणजेच, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

योजनेबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चर्चा देखील यात सुरू आहेत. दरम्यान, मतदान 20 नोव्हेंबर रोजी झाले असून मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी त्या जाहीर झाला. निकालानुसार, जनतेने कौल महायुतीच्या बाजुने दिला असून भाजप राज्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग महायुतीचा सुकर झाला आहे. महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

थंडीच्या कडाक्यात पावसाची एन्ट्री, ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये राज्यातील नवीन सरकार देणार आहे. तत्पूर्वी,आता योजनेतील प्रत्येक निकषांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा दीड हजारऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana ‘या’ निकषांची होणार पडताळणी

योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img