4.9 C
New York

Arvind Kejriwal : काँग्रेसनंतर केजरीवालांचाही डाव, दिल्ली निवडणुकीत आघाडी नाहीच; स्वबळावर लढणार

Published:

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या (Delhi Assembly Elections) आहेत. सत्ताधारी आम आदमी पार्टीने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसला जोरदार (Congress Party) धक्का दिला आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याच पक्षाशी आघाडी करणार (INDIA Alliance) नाही. या निवडणुका आप स्वबळावर लढणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने इंडिया आघाडीला जोरदार झटका बसला आहे.

दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 62 आमदार आम आदमी पक्षाचे आहेत. केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांना निवडणुकीतील आघाडीबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले, आमचा पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही. केजरीवाल यांच्या घोषणेआधी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर केजरीवाल यांनीही स्वबळाचा नारा दिल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीला तडे जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं…

अरविंद केजरीवाल यांच्यावर कालच एका रॅली दरम्यान हल्ला झाला होता. माझ्यावर फेकण्यात आलेला द्रव पदार्थ हानिरहित होता परंतु, तो धोकादायक ठरू शकला असता. मागील 35 दिवसांच्या काळात माझ्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. माझ्यावर हल्ले करून आणि माझ्या आमदारांना अटक करून दिल्लीचे व्यापारी, महिला सुरक्षित राहतील का असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.

गुन्हेगारांना सोडून तक्रार करणाऱ्यांना अटक केली जाणार आहे का. गुन्हेगारांना सोडून आमच्या आमदारांना टार्गेट करण्याचं काम केंद्रीय गृहमंत्र्यांकडून होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा संदर्भ यामागे होता. यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img