ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं आत्मक्लेष आंदोलन पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएमविरोधात सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला आज जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिलाय. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ईव्हीएम पहिल्यांदाच अगदी थेटपणे अविश्वास व्यक्त केला. आम्हाला काही लोकांनी ईव्हीएम मशीन कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन दिले होकते. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनीही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला.
अन्यथा… लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट
Sharad Pawar नेमकं काय म्हणाले शरद पवार?
ईव्हीएम कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिलं होतं. आम्ही त्यावर आमची कमतरता होती की विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असा अंदाज नव्हता. असे कधी वाटलेही नव्हते. आम्ही याआधी कधीही निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला नव्हता. पण आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यात काही तथ्य दिसत आहे.