-0.5 C
New York

Mega Block : मुंबईच्या तीन रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Published:

तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय का? तर थांबा (Mega Block) आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहाच. रविवारी उपनगरीय रेल्वेवर तिन्हा मार्गावर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 1 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही. मध्य रेल्वेवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वेवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

Mega Block मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, असणार आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. तर दरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी धीम्या मार्गावर धावतील.

Mega Block हार्बर रेल्वेवर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक

तर हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे परिणामी ब्लॉक काळात पनवेल आणि वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूर मार्गावरून बदलून धावतील.तसेच या मार्गावरील काही गाड्यांची सेवा रद्द करण्यात येईल.

अन्यथा… लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट

Mega Block पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असेल, चर्चगेट आणि माहिम स्थानकांदरम्यान परिणामी ब्लॉक कालावधीत सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहिम स्थानकांवर थांबणार नाहीत. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या ठिकाणी पश्चिम रेल्वेवरील फ्लाय ओव्हर सस्पेंशनमुळे लोकल थांबणार नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img