राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भारत निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) शिष्टमंडळाला आमंत्रित केलंय. निवडणूक आयोगाने (Elections Commission Of India) कॉंग्रेसला त्यांच्या अंतरिम प्रतिसादात प्रत्येक टप्प्यावर उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार केलाय. निवडणूक आयोगाने कॉंग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन दिलं आहे.
निवडणूक आयोगाच्या मते, मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे एजंट यांच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचे पालन केले जाते. निवडणूक आयोगाने (EC) महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीबाबत (Maharashtra Elections) काँग्रेसच्या शिष्टमंडळाला 3 डिसेंबर रोजी भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनेही ईव्हीएम प्रक्रियेबाबत काही शंका व्यक्त केल्या होत्या. निवडणूक पॅनेलने म्हटलंय की, ते काँग्रेसच्या सर्व वैध चिंतेचा आढावा घेतील. पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून लेखी प्रतिसाद देईल.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) काँग्रेसला दिलेल्या अंतरिम उत्तरात प्रत्येक टप्प्यावर उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रिया असल्याची पुष्टी केली. ECI ने देखील पुनरुच्चार केला की राजकीय पक्षांच्या सहभागासह पारदर्शक मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आहे, मतदानाच्या आकड्यांबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना, निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानाच्या आकडेवारीमध्ये (EVM) कोणतीही तफावत नाही मतदान केंद्रनिहाय सर्व उमेदवारांसोबत उपलब्ध आहे. त्याची पडताळणी केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, “संध्याकाळी 5 वाजता मतदानाची आकडेवारी आणि अंतिम मतदारांमधील फरक प्रक्रियात्मक प्राधान्यांमुळे आहे, कारण पीठासीन अधिकारी मतदानाची आकडेवारी अद्यतनित करण्यापूर्वी मतदानाच्या शेवटी अनेक वैधानिक कर्तव्ये पार पाडतात.
काँग्रेसने शुक्रवारी आरोप केलाय की, “संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेशी गंभीरपणे तडजोड केली जात आहे”, त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. काँग्रेसच्या निवेदनात म्हटलंय की, “काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) असे मानते की संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेशी गंभीरपणे तडजोड केली जात आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका ही घटनात्मक अट आहे. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारामुळे त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून अधिकृत मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी 7.83 टक्क्यांनी कशी वाढली? याची माहिती घेतली आहे.