-0.5 C
New York

Bhai Jagtap : EC म्हणजे कुत्रा; टीकेच्या ओघात काँग्रेस नेते भाई जगतापांचे बोल बिघडले

Published:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता ईव्हीएमवरून राजकारण तापले आहे. या पराभवाचे खापर विरोधी पक्षांचे नेते ईव्हीएमवर फोडत असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) तुलना कुत्र्यासोबत केली आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, सोशल मीडियावर यूजर्सने जगताप यांचा जोरदार क्लास घेत विरोधक जिंकल्यावर बोलत नाहीत आणि हरले की ईव्हीएमला दोष देऊ लागतात.

निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. नरेंद्र मोदींच्या दारासमोर पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून बसतात, असं भाई जगताप म्हणाले. लोकशाही बळकट करण्यासाठी आयोगाची निर्मिती केली आहे, मात्र दुर्दैवाने त्याचा गैरवापर करून आज देशभरात जे घोटाळे होत असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे आता मोदी-शहांचे लाडके भाऊ नाही, राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

जगताप म्हणाले की, मी ४५-४७ वर्षांपासून राजकारणात असून, सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत वेगळा निर्णय येतो, जनतेचा निर्णय येतो आणि अचानक या सर्व गोष्टी घडतात. हा सर्व ठरवून केलेला खेळ आहे. त्यामुळे बॅलेट पेपर आलेच पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. भाई जगताप यांच्या वक्तव्यापूर्वी काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

Bhai Jagtap दरेकरांकडून जशास तसे उत्तर

या विधानावरून भाई जगताप यांच्यावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार असे दरेकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img