0.5 C
New York

Fengal Cyclone : ‘फेंगल’ चक्रीवादळ येत आहे, 13 उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

Published:

पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती अजूनही कायम आहे. (Fengal Cyclone) तर पश्चिम बंगालच्या खाडीत तमिळनाडू, पदुचेरीजवळ फेंगल चक्रीवादळाचं सावट आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाल आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे.

या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या ढगाळ हवामानाही राज्यातील बहुतांशी भागात स्थिती तयार होऊ शकते. एवढेच नाही तर सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशीव परिसरात राज्यात 3 डिसेंबर रोजी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मोहर गळून पडण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. दुसरीकडे उत्तरेकडून गार वारे वाहात असून त्यामुळे महाराष्ट्रात शीत लहरींचा इशाराही देण्यात आला आहे.

‘एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार’, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान

तसेच तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मुसळधार पाऊस पडेल.

तर 6 डिसेंबर रोजी सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रुपांतरित झाल्यास महाराष्ट्र राज्यात त्याचा परिणाम कमी होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img