ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा
गेल्या तीन दिवसांपासून डॉ.बाबा आढाव यांचे लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रपवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांचा आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला.
महायुतीची आजची बैठक रद्द, सूत्रांची माहिती
दिल्लीमधील महाबैठकीनंतर आज राज्यात महायुतीची बैठक होणार होती. पण आजची बैठक रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कंटेनरच्या धडकेत दोन दुकाचीस्वार जागीच ठार
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून देविदास लक्ष्मण उरकुडे, आणि देविदास केशव, मडावी अशी मृतांची नावे आहेत.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर ईडीचे छापे
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर ईडीचे छापे
जुहू येथील घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे.
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाडा खडकोना ते मेंढवन खिंडीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांच्या जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे.
भाजपचा विधीमंडळ गटनेता लवकरच ठरणार
भाजपचा विधीमंडळ गटनेता नेमणूक केली जाणार आहे त्यानंतर २ तारखेला मुख्यमंत्री शपथ होऊ शकते – सूत्राची माहिती
नांदेडचा पारा 13 अंशांवर, थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा
नांदेड जिल्ह्यात मागिल तीन दिवसापासून किमान तापमानात घट मोठी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी तर दुपारीदेखील थंडी असल्याने थंडीपासून संरक्षण करण्याठी नागरिक उबदार कपडे घालत आहेत . त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा यासाठी ग्रामिण भागात जागोजागी शेकोट्या देखील पेटवल्या जात आहेत.