महायुतीला (Mahayuti) राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्यात (Satara) आहेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. त्यामुळं आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही, असं सुत्रांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांची तब्येत अगोदरच काहीशी बरी नसल्याने त्यांनी मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच या गुरुवारी मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांनी अचानक सातारा येथील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून काल (दि. 30) संध्याकाळी ते हेलिकॉप्टरने गावी पोहोचले. पण, आता त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याची माहीती आहे. शिंदे सध्या त्यांच्या गावातील निवासस्थानी आहेत. त्यांनी कुणाचीही भेट घेणे टाळलंय. दरम्यान, रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईकडे पुन्हा रवाना होण्याची शक्यता आहे.
नवं सरकार महाराष्ट्राला पाणीदार करणार, फडणवीसांचं प्रतिपादन
Eknath Shinde नेमकं काय घडले?
एकीकडे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतांनाच शिंदेंनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंद केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं. एकनाथ शिंदे यांना ताप आणि थंडी वाजत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे आज आपल्या दरे गावातच विश्रांती घेणार आहेत.
Eknath Shinde एकनाथ शिंदे नाराज?
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केला जात नसल्यानं शिंदे नाराज असल्याचं कळत आहे. कारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाल्याशिवाय, पुढची चर्चा होणार नाही, असा पवित्रा शिंदे आणि अजित पवारांनी घेतल्याचं कळतंय.