4.2 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांवरील बदला घेण्याचा ठपका पुसून निघेल; काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा

Published:

मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आहेत. काही गोष्टी सांगून ते राजकारणात करतात, तर काही गोष्टी न सांगता करतात. फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे. मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या नव्या इंनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, वडेट्टीवारांच्या या कौतुकामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते नागपूर येथे बोलत होते.

Devendra Fadnavis त्यांच्यावर बसलेला ठपका पुसून निघेल

वडेट्टीवार म्हणाले की, मध्यंतरी त्यांचे नाव ते बदला घेण्याचं राजकारण करतात असा ठपका होता, तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, मात्र वैयक्तिक वैरी नसावं, जो समज झाला होता तो समज ही पुसून निघेल, असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.

दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. बॅकलॉक त्यांनी भरून काढावा, देवेंद्र फडणवीसांवर त्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया असेही वडेट्टीवर म्हणाले.

शिंदे उपमुख्यमंत्री पद नाही घेतलं तर दुसरा चेहरा आहे, त्यांची मजबुरी आहे. त्यांना पक्ष संभाळण्यासाठी त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल. मंत्री पद मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी घेतले, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 2029 मध्ये येथे दोन्ही चेहरे उपमुख्यमंत्री पदाचे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेत मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाहीत असेही वडेट्टीवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img