4.2 C
New York

Sanjay Raut : ईव्हीएम घोटाळ्याविरोधात संजय राऊत आक्रमक

Published:

राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर (EVM Issue) शंका उपस्थित केलीय. फेरमतमोजणीची मागणी केलीय. या निकालाला विरोध केला जातोय.

दरम्यान अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. जेष्ठ सामाजि कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांनी यासंदर्भात आत्मक्लेष आंदोलन सुरू केलंय. ते 95 वर्षांचे आहेत. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. त्यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजसेवक अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे.

फडणवीसांवरील बदला घेण्याचा ठपका पुसून निघेल; काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा

संजय राऊत म्हणाले की, आम्ही हा विषय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्द लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करतोय. याची जाणीव राज्यातील जनतेने ठेवावी. भलेही अण्णा हजारे झोपलेले असतील, इतर वेळी क्रांतीच्या मशाली पेटवणारे लोक झोपले असतील. परंतु, बाबा आढाव यांच्यासारखा नेता लोकशाहीची मशाल विझू नये म्हणून रस्त्यावर उतारला आहे. त्याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

बाबा आढाव म्हणत आहेत की, देशामध्ये लोकशाहीचं वस्रहरण सुरू झालंय. लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचा मोठा गैरवापर झालाय. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल हा वेगळा कसा लागतो, असा सवाल बाबा आढाव यांनी उपस्थित केलाय. आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन करत याविरोधात आवाज उठवण्याचं गरजेचं आहे, असं देखील म्हटलंय. यावरून मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img