4.2 C
New York

Role of Caretaker CM :’काळजीवाहू’ मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात तरी कोणते?

Published:

काही दिवसाआधी विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आणि महायुतीच्या दिशेने जनतेने कौल दिलं. मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याबाबत आता महायुतीत चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं सांगत नवा पेच निर्माण केलाय तर निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आणि राज्यपालांनी नवा मुख्यमंत्री येईपर्यंत एकनाथ शिंदे यांची “काळजीवाहू” मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.. पण मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्री यात काय फरक आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार हे “काळजीवाहू” मुख्यमंत्र्यांकडे असतात का ? जाणून घेऊयात.. या व्हिडिओच्या माध्यमातून..

२६ नोव्हेंबर रोजी १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ समाप्त झाला.महविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झालेल्या या सामन्यात महायुती बहुमताने विजयी झाली तर महविकास आघाडीला पराभवाची धूळ चाखायला लागली आणि पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली पण बहुमत असूनही अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला नाही. तत्पूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हाती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांची नियुक्ती थेट “काळजीवाहू” मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली.

EVM Issue : पवारांच्या खास शिलेदाराकडून सुजय विखेंचा लोकसभेतील प्लॅन रिपीट

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतात. पण त्यांना पुढील शपथविधी होईपर्यंत सत्ता सांभाळण्याचे निर्देश दिले जातात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती ही राज्यपाल करतात. राज्यात कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. राज्यपालांकडे केवळ कार्यकारी अधिकार आहेत. वास्तविक कार्यकारी अधिकार आणि निर्णय घेण्याची शक्ती ही मुख्यमंत्र्याकडे असते. मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्य प्रवक्ते असतात. त्याचबरोबर ते मंत्रीपरिषदेचे प्रमुख ही असतात. त्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री परिषद ही भंग होते तर अनेक अधिकार ही मुख्यमंत्र्यांना असतात.. पण याउलट काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्याकडे असे कोणते ही अधिकार नसतात.

ज्यावेळी मुख्यमंत्री राजीनामा देऊन त्या पदावरून पाय उतार होत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान होतात त्यावेळी त्यांच्या अधिकारांवर मर्यादा येतात..जे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात तेवढे अधिकार काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे नसतात आणि महत्त्वाचं म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री कुठलीही नवीन योजना सुरु करु शकत नाही. जर राज्यात काही योजना सुरु असतील, तर त्या योजनांवर देखरेख ठेवण्याचं काम हे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे असते. नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी होईपर्यंत हे अधिकार काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे असतात पण त्या पदावर मुख्यमंत्री विराजमान झाले की काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे सगळे अधिकार संपून जातात. त्यामुळे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार संपुष्टात येणार का की पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img