झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका “देवमाणूस”फेम अभिनेत्याने नुकताच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना त्या अभिनेत्याने पूर्णविराम दिला आहे. खलनायकाची भुमिका साकारणारे किरण गायकवाड (Kiran Gaikwad )याने आपल्या सोशल मिडियावर ‘ती’चा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘देवमाणूस’या मालिका खुप गाजली आणि त्या मालिकेत प्रमुख खलनायक म्हणून अभिनेता किरण गायकवाड याने डॉक्टरांची भुमिका साकारली.
अभिनेता किरण गायकवाड याने आपल्या सोशल मिडियावर ‘ती’चा फोटो शेअर करत “ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” असं कॅप्शन दिलं आहे. “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस;पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो…ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर”! असं लिहत आपल्या होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केल्याने चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.
Shilpa Shetty-Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा पुन्हा ईडीच्या रडारवर; घर अन् कार्यालयावर धाडसत्र
किरण गायकवाड याची होणारी बायको ही दुसरी तिसरी कोणी नसून ‘देवमाणूस’ मालिकेतील आपली सहकलाकार असलेली ‘सोनू’ ची भुमिका साकारणारी ‘वैष्णवी कल्याणकर'(Vaishnavi Kalyankar) ही आहे. वैष्णवी कल्याणकर ही एक अभिनेत्री असून तिने देखील ‘देवमाणूस-२’, ‘तू चाल पुढं’ या प्रसिद्ध मालिकेत काम केलं आहे. त्याशिवाय ती सध्या ‘तिकळी’या मालिकेत महत्त्वाची भुमिका साकारताना दिसत आहे. किरम गायकवाड याने त्या दोघांचा फोटो शेअर केल्यावर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर वैष्णवी कल्याणकर हीने ‘अहो’ अशी कमेंट देखील केली आहे. किरण प्रेमाची कबुली दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत तर अनेक कलाकारांना त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.