4.2 C
New York

Devendra Fadnavis : ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

Published:

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर आता देखील अद्याप नवं सरकार स्थापन झालं नाही. (Devendra Fadnavis ) विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले, ज्यात महायुतीला दणदणीत असं यश मिळालं. २८८ सदस्यांच्या विधानसभेत २२५ जागा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला मिळाल्या. यात सर्वाधिक १३२ जागा भाजपला मिळाल्या होत्या.

अद्याप सरकार स्थापनेच्या हलचालीमहायुतीला दणदणीत यश मिळून देखील झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असे सांगितले होते. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून तेट 5 वर्षासाठी मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आली आहे.

भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं झाल्याने आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कुठली जबाबदारी असणार आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान येत्या २ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.

पवारांच्या खास शिलेदाराकडून सुजय विखेंचा लोकसभेतील प्लॅन रिपीट

Devendra Fadnavis’मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार

एकनाथ शिंदे यांनी 21 जून 2022 साली 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंनी 30 जूनला मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न यावेळी अपूर्ण राहिले होते. शिंदे-फडणवीस यांच्या सोबत पुढे अजित पवार देखील सरकारमध्ये स्थापन केले. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने 2024 सालच्या निवडणुका एकत्रित लढल्या. यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. राजकीय वर्तुळात त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा चर्चा सुरु झाल्या. त्यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img