7.7 C
New York

Pankaja Munde : भाजपचं प्रदेशाध्यक्षपद पंकजा मुंडेंकडे ?

Published:

पाच दिवस महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून झाले तरी, नवे सरकार राज्यात अद्याप स्थापन झालेले नाही. निर्विवाद बहुमत महायुतीला मिळाले असले तरी, मुख्यमंत्रिपदावर गाडे अडले होते. पण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने आता भाजपा नेते फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या मंत्रिमंडळात तरुणाईला संधी देण्याबरोबरच भाजपाकडून जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाला आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक 132 जागा मिळाल्या.भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचे श्रेय जात असल्याने मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. या मिळालेल्या यशाबरोबरच भाजपाची प्रतिमाही उंचावण्याचा मानस पक्षश्रेष्ठींचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच नव्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने तरुणाई जास्त संख्येने असेल. म्हणजे, मंत्रिमंडळातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांच वय 50पेक्षा कमी असू शकते, असे सांगण्यात येते.

पण त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, मिलिंद नरोटे, समीर कुणावर, संजय कुटे, किशोर जोगरेवार, रमेश कराड, अतुल सावे, राजेश पवार, अभिमन्यू पवार, राम भदाणे, गिरीश महाजन, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, राजन नाईक, अतुल भातखळकर, अमीत साटम, राहुल कुल, महेश लांडगे, राधाकृष्ण विखे पाटील, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला आज दिवाळी बोनस

विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करू त्या जागी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्यामध्ये जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो शिवाय, पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास देवेंद्र फडणवीस यांना तो अडसर ठरू शकतो.

सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे राज्यपातळीवरील राजकारणातून जवळपास पाच वर्षे पंकजा मुंडे काहीशा बाजूलाच पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना थेट लोकसभेत संधी देण्यात आली. पण तिथेही त्यांचा पराभव झाला. यावर्षी जुलैमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या विजयी झाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img