नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारूण पराभव झाला. या पराभवामुळे महाविकास आघाडीतील पक्ष या पराभवाचं मंथन करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या बैठकीतस्वबळाचा नारा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशातच आता आगामी काळात होणार आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नाशिक जिल्ह्यात बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Mahavikas Aghadi ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा
येणाऱ्या काळात निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीनंतर धुसफूस पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर ठाकरे गटाची नाराजी आहे. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटलं आहे महानगर प्रमुखांची माहिती आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना मागणी करणार आहे, असं शिंदे म्हणाले.
कोण होणार CM? अमित शहा-तावडेंची खलबतं; आज दिल्लीत बैठक
Mahavikas Aghadi ठाकरे गटाच्या खासदाराला गावबंदी
नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गद्दारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महायुतीच्या उमेदवाराचं काम केल्याचा आरोप महाविकास आघाडीत असताना वाजे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खासदारांना गावबंदीचा फलक सिन्नरच्या वडझिरे गावात झळकला लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी खासदारांना गावबंदीचा फलक लावला आहे. ग्रामपंचायतीने तासाभरात खासदारांना गावबंदीचा फलक हटवला आहे. मात्र फलकामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.