7.1 C
New York

Nana Patole : अचानक 76 लाख मतदान कसं वाढलं?, पटोलेंचा सवाल…

Published:

महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केला.

निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे अशी मागणी करत निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर डॉ. विश्वजीत कदम, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावार चिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, ५ वाजल्यानंतर मतदानाच्या दिवशी मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता लांबच लांब रांगा मतदारकेंद्रावर लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल पटोलेंनी केला.

महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्याचा निर्धार ; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Nana Patole निवडणूक आयोगाकडून लोकशाहीची क्रूर थट्टा

पटोले म्हणाले की, वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img