राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाहीत, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. छगन भुजळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असू शकेल यावर भाष्य केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भुजबळ पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा फडणवीस यांनी मी बाहेरून काम करेन असं सांगितलं होतं. पण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांना सरकारमध्ये राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी त्या सूचनांचं पालन केलं.
राज्यात मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपचा नवीन नियम
पक्षाचा आदेश मानला. महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून त्यांनी सहकार्य केलं. शक्ती पाठीमागे उभी केली. त्यामुळे आता काही लोक त्यांना टार्गेट करत आहेत. याचं कारणही तेच आहे असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आता त्यांनी कुणाचं नाव न घेता वक्तव्य केल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Chhagan Bhujbal आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राची धास्ती
राज्याचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यासाठी आज राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. सध्या तरी फडणवीसांचाच दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र तरी देखील ऐनवेळी दुसरेच नाव समोर येईल का अशी शंकाही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याबाबत विचारले असता फडणवीस यांनी काहीच न बोलता फक्त हात जोडले.