मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक आज येणार मुंबईत
मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्यासाठी आज केंद्रातील निरीक्षक मुंबईत येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत याबाबत दिल्लीत बैठक चालली. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिसतं आहे. तर उपमुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा अजितदादांना मिळणार आहे. तर शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यापैकी एकजण उपमुख्यमंत्री होणार आहे. दोन निरीक्षक आज दिल्लीतील बैठक संपल्यानंतर या तीन्ही नेत्यांबरोबर महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन नावं जाहीर करणार आहेत.
महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही – संजय राऊत
आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काही कार्यकर्त्यांची वेगळं लढवी अशी भूमिका असते. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झाला नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. हे जिंकले त्यांची ही भूमिका नाही. जे पराभूत झाले आहेत त्यांना असं वाटण चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र की महाविकास आघाडी म्हणून लढायच्या हे आम्ही ठरवू. एवढी घाई कशाला, आणखी त्याला वेळ आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक
आज एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक
या बैठकीनंतर महाराष्ट्राची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांना दिल्लीत भेटणार
दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व खासदार आज दिल्लीत
बदलापूर गारठले; पारा १२.६ अंश सेल्सिअसवर
शहरात दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून बुधवारी बदलापुराचे तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर आले. यामध्ये या मोसमातील नोव्हेंबरमधील किमान तापमानाची नोंद करण्यात आली. या गुलाबी थंडीत बदलापूरकर गारठून गेल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले.