6.6 C
New York

BJP : राज्यात मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपचा नवीन नियम

Published:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. आता दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भाजपचा (BJP) असणार असल्याचे संकेत मिळत आहे. तसेच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे २० मंत्री असणार आहेत. भारतीय जनता पक्ष युवा आमदारांना नवीन मंत्रिमंडळात संधी देणार आहे. ज्येष्ठ आमदार आणि शिंदे सरकारमधील काही जणांना त्यामुळे डच्चू मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना भाजपची भविष्यातील रणनीती म्हणून मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे.

BJP भाजपचा असा नियम

‘पार्टी विद डिफरेंस’ असा दावा भाजपकडून नेहमी केला जातो. त्यामुळे भाजपने खासदारकीसाठी कठोर निर्णय घेतले. काही जणांना खासदारकी गमवावी लागली. राजकीय निवृत्ती लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या सारख्या पक्षाची उभारणी करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना घ्यावी लागली. संसदेत 75 वयाचा निकष भाजपने ठेवला होता. आता भाजपने राज्य पातळीवर नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळात भाजप जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी देणार आहे. त्यात 50 वर्षांपेक्षा कमी वय हा निकष लावण्यात येणार आहे. अनेक जेष्ठ सदस्यांना त्यामुळे मार्गदर्शकांची भूमिकेत जावे लागणार आहे.

श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री?

BJP महाराष्ट्रातील या संभाव्य नावांना बसू शकतो फटका

महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील मंत्री असणारे किंवा काही ज्येष्ठ भाजप नेते मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना भाजपने लावलेल्या निकषाचे पालन केल्यास फटका बसू शकतो. त्यात (वय 65) चंद्रकांत पाटील, (वय 64) गिरीश महाजन, (वय 55)चंद्रशेखर बावनकुळे, (वय 68) मंगलप्रभात लोढा, (वय 65) राधाकृष्ण विखे पाटील, (वय 62)सुधीर मुनगंटीवार, (वय 54)रवींद्र चव्हाण, ( वय 59) अतुल भातखळकर मंदा म्हात्रे (वय 68), मनीषा कायंदे (वय 61) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामधील मंत्रिमंडळात भाजप यापूर्वी धक्कादायक तंत्राचा अवलंबन केला होता. अनेक चर्चेतील नावांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. आता तोच धक्कातंत्र राज्यात राबवणार असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img