महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी असं असतानाच देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर त उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्या शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या खोट्या बातम्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.
Sanjay Shirsat शिंदेंसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांना संजय शिरसाट हे भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यनमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणालाही फोन आलेला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही, असं शिरसाट म्हणालेत.
गुन्हेगारांची फौज आता महाराष्ट्र विधानसभेत, 65 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर गुन्हे
Sanjay Shirsat टायगर जब गुर्राता हैं तो…
टायगर मरा ही कब था?, राज्यात टायगर जब गुर्राता हैं तो क्या होता हैं?सगळ्यांना माहीत आहे भूचाल आत्ता हैं… हे भाजपलाही माहीत आहे त्यामुळे भाजप योग्य निर्णय घेईल. रावसाहेब दानवे यांच्या वकितव्याशी मी सहमत नाही. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बहुतेक रावसाहेब दानवे यांनी बातचीत केली असेल त्यांना त्यांनी काही सांगितलंय का ? हे पहावं लागेल, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.