4.6 C
New York

Sanjay Shirsat : मुख्यमंत्री कोण होणार? संजय शिरसाट यांचं महत्वाचं वक्तव्य

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीचे तब्बल 230 उमेदवार विजयी झाले. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे केवळ 50 उमेदवार विजयी झाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही एका पक्षाला किमान 29 जागा आवश्यक असतात मात्र महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांपैकी एकालाही 29 जागा मिळवता आलेल्या नाहीत. राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात थोड्याच वेळात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काय घडणार याबाबत मला कल्पाना नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? आज कदाचीत मुख्यमंत्री या सर्व प्रश्नांची उत्तर देतील असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं आहे.

‘लोकसभेतील पराभवानतंर आम्ही..’ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवर भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

दरम्यान यावेळी पुन्हा राज्यात भूकंप होईल का? अशी स्थिती आहे का? संजय शिरसाट यांना असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. यावेळी बोलताना शिरसाट यांनी म्हटलं की, काही सांगता येत नाही, नेमकं काय एकनाथ शिंदे यांच्या मनात चाललंय हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात त्यावेळी निश्चित काही तरी घडतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img