6 C
New York

BJP : मुख्यमंत्रिपदा बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर ?

Published:

महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असताना नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर असं असताना दावा करत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांना भाजपकडून दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे. भाजप मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठीआग्रही आहेत. तसं एकनाथ शिंदे यांना भाजपने कळवल्याची माहिती आहे. शिवाय उमुख्यमंत्रिपदाची आणि केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर त्यांना दिल्याचीही माहिती आहे.

BJP भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दिल्लीतून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

‘अजित पवार शरण गेले त्यांनी आमची..’, शिंदे गटाच्या नेत्याचा अजितदादांवर हल्लाबोल

BJP शिंदे गटाचा मुख्यमंत्रिपदावर दावा

शिवसेना शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवली गेली आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं, अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी मोठी मदत झाली. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही योजना आल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img