आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्योजक गौतम अदानी आणि (Gautam Adani) त्यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीचं (Adani Green Energy) मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कंपनीने बुधवारी स्पष्ट केले आहे की अमेरिकेत जे लाचखोरीचे आरोप झाले आहेत ते सगळे निराधार आणि खोटे आहेत. अमेरिकी फेडरल करप्शन प्रॅक्टिस कायद्यांतर्गत आरोप झाल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या देखील पूर्णपणे चुकीच्या आहेत असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
उद्योग समुहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस डीओजे प्रॉसिक्यूशन किंवा यूएस एईसीच्या तक्रारीत अमेरिकी फेडरल करप्शन प्रॅक्टिस कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच प्रकरण नाही. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आता या सर्व प्रकरणी अदानी ग्रुपने नेमकं काय म्हटलं आहे हे जाणून घेऊ या..
मुख्यमंत्रिपदा बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन मोठ्या ऑफर ?
अदानी ग्रीन एनर्जीने म्हटलं आहे की, गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचे कोणतेच आरोप नाहीत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रॉसिक्यूशनमध्ये फक्त Azure आणि CDPQ ऑफिशियल्सवर लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अदानी उद्योग समुहातील कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर जे काही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते त्याच्या ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.
खरंतर न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने सुनावणी दरम्यान गौतम अदानींच्या कंपनीवर अमेरिकी गुंतवणुकीत फ्रॉड करण आणि सोलर एनर्जी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारताच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप ठेवला आहे. 2020 पासून 2024 पर्यंत सोलर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने भारतीय अधिकाऱ्यांना मोठी लाच देण्यात आल्याचे कोर्टाने लावलेल्या आरोपांत नमूद करण्यात आले आहे.