4.9 C
New York

Chandrashekhar Bawankule : ठाकरेंनी धोका दिला पण शिंदेंचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा, बावनकुळेंचा हल्लाबोल

Published:

विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे नाराज आहे असं म्हणत होते मात्र आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीचे (Mahayuti) नेते म्हणून अंत्यत स्पष्टपणे विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेईल ते निणर्य मान्य असेल अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांचे आभार. असं पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यात अनेक योजना राबवले आहे. तसेच फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवले. आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे. मी त्याचा स्वागत करते. त्यांची भूमिका राज्याला पुढे नेण्याची भूमिका आहे. तसेच त्यांचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा आहे असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार…

आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाहीतर आमची लढाई राज्यातील 14 कोटी जनतेसाठी होती त्यामुळे जनते आम्हाला प्रचंड बहुमत दिले. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी लढाई करत होती. त्याच्यात 8 मुख्यमंत्री होते. शरद पवार यांच्याकडे 3 आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मुख्यमंत्री होते असं बावनकुळे म्हणाले.

तसेच सरकार स्थापन करण्यासाठी भाजप केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेल. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला होता अशी टीका देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना धोका दिला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली. महायुतीची सरकार आण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. एकनाथ शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते आहे. असं देखील चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img