6 C
New York

Election Commission : राज्यातील ‘या’ मतदारसंघात होणार फेर मतमोजणी; कारण काय?

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. भाजपनं तब्बल 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पुन्हा मिळवला. तर एकनाथ शिंदे शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 41 आमदार निवडून आणत दमदार कामगिरी केली. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर घोडं अडलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. तर आता ठाकरे गटालाही निवडणूक आयोगाकडून (Election Commission) दिलासा मिळाला आहे. नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमुळे भाजपला अभूतपूर्व यश; कसं केलं होतं मायक्रो प्लानिंग?

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली. या मतदारसंघात यंदा कमळ फुललं. महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी 1 लाख 41 हजार 725 मते मिळवत विजय साकारला. ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा 68 हजार 177 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत बडगुजर यांना एकूण 73 हजार 548 मते मिळाली. तर मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी 46 हजार 649 मते घेतली. यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मयत व्यक्तींच्या नावानेही मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img