6 C
New York

Ramdas Kadam : ‘अजित पवार शरण गेले त्यांनी आमची..’, शिंदे गटाच्या नेत्याचा अजितदादांवर हल्लाबोल

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. भाजपनं तब्बल 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पुन्हा मिळवला. तर एकनाथ शिंदे शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 41 आमदार निवडून आणत दमदार कामगिरी केली. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर घोडं अडलं आहे. याच मुद्द्यावर आता महायुतीत ताणाताणी सुरू झाली आहे. शिंदे गटाच्य आमदारांना पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत आहे तर भाजपनेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा दावा केला आहेत.

यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी (Ramdas Kadam) थेट अजित पवार यांच्यावर टीका (Ajit Pawar) करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याआधी जेव्हा 2023 मध्ये अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं होतं तेव्हाही आमच्या लोकांना मंत्रीपदं मिळाली नाहीत असे रामदास कदम म्हणाले आहेत.

कदम पुढे म्हणाले, भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस तर आमच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. अजित पवार तर शरण गेले आहेत त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली हा भाग वेगळा. मुख्यमंत्रि‍पदावरून कुणी कितीही काहीही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहील असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img