4.6 C
New York

Helmets Mandatory : चाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती

Published:

दुचाकी (बाईक) चालकांसाठी नवा नियम समोर आला आहे. चालकासह सोबतच्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हा नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Helmets Mandatory) बिना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाईचा इशारा देणारे पत्रक नुकतेच वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहे. (Section 129 of MV Act 1988) अंतर्गत हा नियम लागू असणार आहे.

Helmets Mandatory  चालकांसाठी नवा नियम

०४ वर्षांखालील रस्ते महाराष्ट्र राज्यातील मार्गांवर अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांचे अपघात, मृत्यूसह तसंच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे, (Section 128 आणि 129 of MV Act 1988) कायद्याच्या तरतुदीनुसार बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांचे सुरक्षिततेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हा नियम करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

रस्ते अपघातांची महाराष्ट्रातील वाढती संख्या गंभीर चिंता व्यक्त करते. वाहतूक विभागाने राज्यातील स्पष्ट केले आहे की, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वार आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या पिलियन रायडरमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मृत्यू आणि जखमींच्या घटनांमध्येही यामुळे मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, वाहतूक विभागाच्या आदेशानुसार, Motor Vehicle Act 1988 च्या Section 128 आणि 129 अंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण अनिवार्य आहे. या तरतुदींनुसार, हेल्मेट न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Helmets Mandatory  दंडात्मक कारवाई

यासंदर्भात विशेष मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरू केली असून, नागरिकांना हेल्मेट वापरण्याची शिस्त लावण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर Section 129/194(D) अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. हेल्मेट न घालणाऱ्या पिलियन रायडरवरही अशीच कारवाई होईल असंही यामध्ये स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img